Tourism - Constra
Loading...

पर्यटन

कास पठार

कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. कास पठार यवतेश्वर गावात आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.[१] अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे. कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.[२] या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.

कास पठार

बामणोली

बामणोली

बामणोली हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य व शांत पर्यटनस्थळ आहे. हे ठिकाण शिवसागर तलावाच्या किनारी असून, येथे बोटींगची विशेष सोय आहे. हिरव्यागार डोंगररांगा, थंड हवामान, आणि प्राचीन मंदिरांचे अस्तित्व बामणोलीला एक अद्वितीय ओळख देतात. येथे वासोटा किल्ल्यासाठी प्रसिद्ध ट्रेकिंग रस्ता आहे जो साहसी पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. बामणोलीच्या परिसरात अनेक औषधी वनस्पती आढळतात, तसेच येथे मंगळादेवी मंदिर आणि सात तळी ही धार्मिक स्थळे आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी बामणोली हे एक आदर्श ठिकाण आहे.

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक गिरीस्थान नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली काही मोजकीच ठिकाणे आहेत. त्यातीलच हे एक ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती, याचे क्षेत्रफळ १३७.५१ किमी.(५२.९५, स्क्वे.मीटर) आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १३५३ मीटर(४४३९ फुट) आहे. सन २०११ चे जनगणनेनुसार याची लोकसंख्या १२७३७ आहे.[१] येथे मराठी, हिंदी या भाषा बोलल्या जातात. पुरुष / स्त्री प्रमाण १०/९ असे आहे. येथील साक्षरता प्रमाण ७८% आहे. ६ वर्षाखालील मुलाची ११% लोकसंख्या आहे.

महाबळेश्वर

पाचगणी

पाचगणी

पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि. मी. अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर येऊन हे डोंगर तयार झाले असावे.असे मानले जाते पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. येथील टेबल लँड वर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे.ह्या ठिकाणी येण्यासाठी मुंबई वरून तीन मार्ग आहेत महड महाबळेश्वर मार्गे, व पुणे वाई मार्गे आणि पुणे वरून सरळ उडतरें गावातून सरळ कुडाळ पाचगणी हा रस्ता आहे

तापोळा

तापोळा हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक अत्यंत निसर्गरम्य आणि शांत ठिकाण आहे, जे महाबळेश्वरपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या ठिकाणाला "मिनी काश्मीर" असेही म्हणतात कारण येथील निसर्ग सौंदर्य, हिरवळ, आणि पाण्याचे मोठे जलाशय पाहताना जणू काही तुम्ही हिमालयाच्या पायथ्याशी उभे आहात असा अनुभव येतो. तापोळामधून कोयना आणि सोला नद्यांनी तयार केलेला शिवसागर जलाशय दिसतो, जो येथील मुख्य आकर्षण आहे. या जलाशयावर बोटिंग, कायकिंग, आणि कॅम्पिंगसारखे साहसी उपक्रम करता येतात. तापोळा हे ठिकाण शांतता आणि निसर्गाशी एकरूप होण्यासाठी आदर्श आहे. येथे अनेक पर्यटक कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी येतात. पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दिवसांत येथे आल्हाददायक हवामान असते, आणि संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. परिसरात असलेले घनदाट जंगल, पक्षीप्रेमींसाठी विविध पक्ष्यांचे आवाज आणि वन्यजीवनाचा अनुभव घेणारे ट्रेकिंग रूटस हे तापोळाचे खास आकर्षण आहेत. त्यामुळेच तापोळा हे पर्यटकांसाठी एक सुंदर आणि विसाव्याचे ठिकाण आहे.

पाचगणी

ठोसेघर

पाचगणी

ठोसेघर धबधबा हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध आणि मनोहारी पर्यटनस्थळ आहे. साताऱ्यापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर वसलेले ठोसेघर हे गाव आपल्या भव्य धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथे पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळते कारण त्या काळात हा धबधबा प्रचंड वेगाने कोसळतो आणि संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला असतो. ठोसेघर येथे एक मोठा आणि अनेक छोटे धबधबे आहेत. मुख्य धबधब्याची उंची सुमारे ३०० मीटर असून, तो दरीतून कोसळताना अतिशय भव्य आणि नेत्रदीपक वाटतो. ठोसेघर परिसर हा जैवविविधतेने समृद्ध असून, येथे अनेक प्रकारचे पक्षी आणि वनस्पती पाहायला मिळतात. येथे एक व्ह्यू पॉइंट असून, तेथून संपूर्ण धबधबा आणि दरीचे दृश्य अनुभवता येते. पावसाळ्यात येथे धुक्याची चादर पसरलेली असते, त्यामुळे दृश्य अधिकच सुरेख दिसते. निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि शांततेचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी ठोसेघर हे एक आदर्श ठिकाण आहे.

प्रतापगड

प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ साली बांधला होता. प्रतापगडचा इतिहास खूप महत्त्वाचा असून, याच ठिकाणी १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफझलखानाशी झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी मोठा विजय मिळवला होता. किल्ल्याचे स्थान उंच डोंगरावर असून, येथे तुळजाभवानीचे सुंदर मंदिर, बुरुज, तलाव आणि गडाभोवती मजबूत तटबंदी आहे. या किल्ल्यावरून सभोवतालच्या दऱ्यांचे आणि डोंगरांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. पावसाळ्यात येथे निसर्गरम्य सौंदर्य अधिक खुलते. प्रतापगड हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून, तो मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचे प्रतीक मानला जातो. पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी हे एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे.

पाचगणी